कुडाळ | प्रतिनिधी
माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला सध्या रिकामटेकडे असलेल्यांना काम नाही त्यामुळे काही बरगळत राहणे हे एकमेव काम माजी लोकप्रतिनिधींनी सुरू केले आहे असे त्यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे आमदार निलेश राणे यांनी बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भात विनायक राऊत यांनी ते गाव केंद्रशासित करा या केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता आमदार निलेश राणे म्हणाले की, काही लोक सध्या रिकामटेकडे आहेत त्यांना कायदा कळत नसलेले आहेत केंद्रशासित एखादा भाग कधी करू शकतो त्याला तशी परिस्थिती लागते एवढ्या उंच विषयामध्ये राऊत यांनी जाऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खाते खूप वर्ष सांभाळत आहे या खून प्रकरणातील सगळे आरोपी पकडले जातील कुणालाही सोडलं जाणार नाही हे वारंवार मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत हे लोकांना समजतं पण विरोधकांना कळत नाही कारण त्यांना ते समजून घ्यायचे नाही असे त्यांनी सांगितले.
चिपी विमानतळाला हिम्मत असेल तर टाळे ठोका
विमानतळ सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे आमदार निलेश राणे यांनी सांगून काही राजकारणी नकारात्मक विचारसरणीने चालतात. त्यामुळे ते पराभूत होतात सातत्याने नकारात्मक राहू नका सकारात्मक सुद्धा विचार करा विमानतळाला टाळ लावण्यासाठी जाण्यापेक्षा नव्या प्रकल्पांसाठी नारळ किती वाढवता येतील याचा विचार करा. नकारात्मक विचार ठेवल्यामुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवले असे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रहार करून कुठे चुकत असेल तर सांगा त्यासाठी तुमचा अनुभव जोडा, हे बंद करू ते बंद करू हेच आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी केलं. विमानतळ बंद करून दाखवा गुन्हे नक्की दाखल होतील. असे सांगून टाळे ठोकू असे जाहीर केले पण अजून टाळे मिळत नाही आहे का ? असा सवालही आमदार निलेश राणे यांनी उपस्थित करून जे कोण टाळे ठोकायला जातील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील मग सांगू नका सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. नकारात्मक न बघता या भूमीचा फायदा कसा होईल हे सुद्धा पहा असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
