Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळभाजी विक्रेता शिवा नायकला संपवले ; पत्नीने दिली कबुली

भाजी विक्रेता शिवा नायकला संपवले ; पत्नीने दिली कबुली

 

कुडाळ | प्रतिनिधी 

आपल्या अनैतिक संबंधांमध्ये बाधा ठरणाऱ्या पतीचा काटा काढल्याची कबुली सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्यामुळे कुडाळ शहरातील भाजीविक्रेता शिवा नायक याचा खून झाल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणातील सुनंदा नायक हिचा प्रियकर सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण हे फरारी आहेत याप्रकरणी सुनंदा नायक हिला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुडाळ शहरातील मारुती मंदिर येथे भाजी विक्री करणारा शिवा नायक यांनी २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघड झाले या आत्महत्ये मागे अनेक गुढ लपल होतं मात्र हे गुढ उलघडताना पोलिसांना काही धागेदोरे सापडले त्या आधारावर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये पोलिसांना यश आले.

शिवा नायक चा ‘गेम’ करायचा आधीच ठरलं होतं

या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या हाती मिळालेल्या माहितीनुसार आणि भ्रमणध्वनीवर शिवा नायक याच्या पत्नीने केलेल्या संवादाच्या आधारावर हे प्रकरण उघडकीस आले २५ डिसेंबर रोजी सिताराम राठोड याने सुनंदा नायक हिला फोन करून शिवा नायक चा गेम वाजवायचा हे सांगितले होते. आणि तिने ठीक आहे. असं म्हटलं होतं. रात्रौ १२:३० वा. च्या दरम्याने ठरल्याप्रमाणे सिताराम राठोड व त्याचे दोन भाचे शिवा नायक राहत असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणी आले. शिवा नायक झोपला होता. आणि झोपलेला असतानाच हे तिघेजण आले सिताराम राठोड याने शिवा नायकचे पाय धरले तर अजित चव्हाण यांनी शिवा नायक च्या तोंडावर जाड कापड ठेवून आदीक चव्हाण यांनी दोरीने गळा आवळला आणि जेव्हा शिवा नायक याचा मृत्यू झाला. त्यावेळी तिघेही त्या ठिकाणाहून निघून गेले. 

पत्नी सुनंदा नायक यांनी रचला बनाव 

ही घटना आत्महत्या वाटावी या दृष्टीने शिवा नायक याची पत्नी सुनंदा नायक बनाव रचला. यामध्ये शिवा नायक याची बहीण हिला शिवा नायक यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सांगितली. तशीच आपल्या आईला सुद्धा सांगितले. पण जेव्हा ही घटना घडली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पथक गेले. त्यावेळी सुनंदा नायक हिने सांगितले की, साडीच्या साहाय्याने आपल्या पतीने आत्महत्या केली. त्याला मी स्वतः उतरविले असे सांगितले मात्र त्यावेळीच पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली शिवा नायक हा शरीराने धडधाकट होता. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर गळफासावरून उतरवणे एका स्त्रीला शक्य नाही. मात्र त्यावेळी त्यांनी कोणतीही चौकशी न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 

भाऊ अशोक नायक यांनी दिला कुडाळ पोलिसात चौकशीचा अर्ज 

या प्रकरणांमध्ये शिवा नायक याचा भाऊ अशोक नायक यांनी ४ जानेवारी रोजी चौकशी अर्ज दिला होता यामध्ये त्यांने शिवा नायक च्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला होता. आणि या प्रकरणांमध्ये घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून त्याची चौकशीची मागणी केली होती. यामध्ये त्यांनी शिवा नायक याची पत्नी सुनंदा नायक हिचे प्रेम संबंध सिताराम राठोड सोबत होते. हे सांगून या प्रकरणांमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. काही मोबाईल वरील कॉल रेकॉर्ड सुद्धा सापडले आहेत.

सुनंदा नायक हिच्या कॉल रेकॉर्ड वरून घातपात झाल्याचे उघड 

या प्रकरणांमध्ये शिवा नायक याच्या पत्नी सुनंदा नायक हिचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता. या कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली आणि भाषांतर केले तर यामध्ये शिवा नायक याचा घातपात झाल्याचे उघड झाले. 

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सुद्धा केली होती चौकशी 

या तक्रारी अर्जावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सुनंदा नायक ची चौकशी केली होती. आणि चौकशी केल्यानंतर तिला सोडण्यात आले होते. ती आपल्या सासरी विजापूर येथील काळगी दांडा येथे गेले होती. या ठिकाणी कुडाळ पोलिसांनी पथक पाठवून तिला कुडाळमध्ये चौकशीसाठी पुन्हा आणले. त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांनी विरोध केला मात्र चौकशीसाठी घेऊन जाणे गरजेचे असल्यामुळे तिला पोलीस घेऊन आले. 

आणि सुनंदा नायक पटापट बोलू लागली

कुडाळ पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सुरुवातीला ती वेगवेगळ्या प्रकारे संदर्भ न जुळवणारी बतावणी करू लागली अखेर पोलिसांनी आपला खाकी इंगा दाखवल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली. शिवा नायक व सुनंदा नायक यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला त्यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दहा वर्षाची मुलगी ही कणकवली येथे राहते तर दोन मुलं ही कुडाळ येथे त्यांच्यासोबत राहत होती. हे प्रकरण घडले त्यावेळी ही मुलं त्यांच्यासोबतच होती. 

चौघांवर केला खुनाचा गुन्हा दाखल 

या चौकशीमध्ये शिवा नायक याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे याप्रकरणी त्याची पत्नी सुनंदा नायक हिने सांगितले की माझ्या व सिताराम राठोड यांच्या अनैतिक संबंधांमध्ये शिवा नायक बाधा ठरत होता. त्यामुळे त्याचा आम्ही काटा काढला. यावेळी सिताराम राठोड यांचे भाचे अजित चव्हाण व आदीक चव्हाण हे दोघेही होते. यावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सुनंदा नायक हिला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. या प्रकरणातील फरारी आरोपी तसेच अजून कोणाचा सहभाग आहे का या खुनासाठी वापरलेली साहित्य हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणातील तिघे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यापासून फरारी झाले आहेत. त्यापैकी अजित चव्हाण हा कुडाळ येथे राहत होता आणि त्याचा भाऊ आदीक चव्हाण या घटनेपूर्वी दोन दिवस अगोदर विजापूर वरून कुडाळ येथे या कामासाठीच आला होता. अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली असून सिताराम राठोड याचा टेम्पो ताब्यात घेतला आहे. 

या प्रकरणातील घरातील सर्वांना पोलीस ठाण्याची हजेरी 

या प्रकरणातील सिताराम राठोड याची पत्नी अजित चव्हाण व अधिक चव्हाण यांच्या आईची कुडाळ येथे हजेरी ठेवली आहे या प्रकरणातील प्रताप पवार हा त्याच्यासोबत मद्य पिण्यासाठी होता त्यामुळे त्याची सुद्धा हजेरी लावण्यात आली आहे. 

शिवा नायक च्या अंत्यविधीला लावली होती हजेरी 

शिवा नायक याचा घातपात करणारे सिताराम राठोड सह त्याचे भाचे या सर्वांनी शिवा नायक याच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. आपल्यावर कोणताही संशय येऊ नये याची खबरदारी घेतली होती मात्र कॉल रेकॉर्ड मुळे सगळं भांड उघड झालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!