कुडाळ तलाठी कार्यालय येथील झाडे चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तलाठी कार्यालय तोडून ठेवलेली सागाची झाडे चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

कुडाळ येथील तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी सागाची झाडे तोडून ठेवली होती ही तोडलेली झाडे ६ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी चोरून गेल्याची घटना घडली होती याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली होती या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करायला महसूल विभागाकडून दिरंगाई केली जात होती. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पाच सागाच्या झाडाचे लाकडाचे तुकडे ज्यांची किंमत ७ हजार रुपये एवढी आहे. ही झाडे अज्ञाताने चोरून घेऊन गेला असे म्हटले आहे. त्यावरून कुडाळ पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध सरकारी परिसरातील झाडे चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लवकरच चौकशी करून या चोरीतील व्यक्तींना ताब्यात घेऊ असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले आहे.