कुडाळ | प्रतिनिधी
भाजीविक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांचेही भ्रमणध्वनी बंद असून या तिघांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगून सुनंदा नायक व सिताराम राठोड हे दोघेही कुडाळ शहरातील लॉजवर गेल्याची माहिती पुढे आली आहे.
कुडाळ शहरातील मारुती मंदिर येथे भाजी विक्री करणारा आणि त्याच परिसरात राहणारा विजापूर येथील शिवा नायक याचा खून करून ही आत्महत्या असल्याचे भासवणाऱ्या त्याची पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिच्यासह तिचा प्रियकर सिताराम राठोड, अजित चव्हाण, आदीक चव्हाण यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील शिवा नायक याची पत्नी सुनंदा नायक हिला पोलिसांनी अटक केली दरम्यान या प्रकरणातील तिचा प्रियकर सिताराम राठोड व अजित चव्हाण, आदीक चव्हाण हे शिवा नायकच्या अंत्यसंस्कार नंतर फरारी झाले आहेत. आता त्यांचे भ्रमणध्वनी बंद आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस जलद गतीने करत असून लवकरच हे तिघेही पोलिसांच्या हाती येतील असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.
सुमीन लॉजची घेतली झडती
कुडाळ शहरातील महामार्गावर असलेल्या सुमीन लॉजवर सुनंदा नायक व सिताराम राठोड हे दोघेही जात होते हे उघड झाले आहे. या हॉटेलच्या नोंदवहया पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या नोंदवह्यांवर असलेली नावे आधार नंबर हे दोघांचेही असल्याचे उघड झाले आहे. २४ डिसेंबर रोजी हे दोघेही या लॉजवर होते. हे सुद्धा उघड झाले आहे. मागील दोन ते तीन महिन्याचे रेकॉर्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावर त्यांची नोंद मिळत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते हे प्राथमिक तपासात उघड होत आहे.
पुन्हा करण्यात आला पंचनामा
शिवा नायक याची आत्महत्या झाल्यावर पोलिसांनी पंचनामा केला होता शिवा नायक राहत असलेल्या ठिकाणी दोन खोले आहेत. त्यापैकी एका खोलीमध्ये त्याचा मृतदेह होता. त्या ठिकाणचा पंचनामा झाला होता. आता खुणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यामध्ये पुन्हा पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये शिवा नायक याला खोलीतील किचन रूम असलेल्या ठिकाणी मारण्यात आले. आणि नंतर दुसऱ्या खोलीत नेऊन आत्महत्या त्याने केल्याचे दाखवून देण्यात आले. हा पंचनामा आता पोलिसांनी पुन्हा केला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले तिघेबद्द
मारुती मंदिर नजीक एका दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता त्या रात्री तिघेजण जात असल्याचे दिसत आहेत. मात्र अजून सुस्पष्ट ते दिसत नसल्यामुळे त्याचाही तपास सुरू आहे.
