कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार २४ जानेवारी रोजी

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी आता निवडणूक लागली आहे २० ते २४ जानेवारी या कालावधीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाचा मान देण्यात आला यामध्ये आफरीन करोल व अक्षता खटावकर यांचा समावेश असून नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक जाहीर केली आहे. २० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणे त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी, अर्ज मागे घेणे या प्रक्रिया झाल्यानंतर २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले जाणार आहे. आणि या विशेष सभेच्या आयोजनामध्ये नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यामध्ये नगराध्यक्षासाठी मतदान हे नगरसेवक हात उंचावून आपले मत नोंदवणार आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी आणि भाजप नगरसेवकांमध्ये हालचाली सुरू झाले आहे.

महाविकास आघाडीचे नगरसेवक शपथीवर ठाम राहणार ?

दरम्यान महाविकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात जाऊन माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर या नगराध्यक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी शपथ घेतली होती की आम्ही पुढील काळात एकत्र राहू आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांना नगराध्यक्षाची संधी मिळणार आहे तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना पुढील दोन वर्षासाठी उपनगराध्यक्ष पद हव आहे यामध्ये महाविकास आघाडी कशी सांगड घालणार आहे याकडे सर्वांचा लक्ष लागून राहिला आहे.