तुळशीनगर येथे पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

0

देवगड | प्रतिनिधी

देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला.देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी सायंकाळी ६ वा.सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, अ‍ेएसआय राजन जाधव, पो.हे.कॉ.उदय शिरगावकर, पोलिस नाईक बिर्जे, नाटेकर, निलेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.हा मृतदेह ५५ ते ६० वर्षे वयोगटातील असून त्याचा मृत्यू तीन दिवसापुर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.मृतदेहाच्या अंगावर शर्ट व हाफ पँट असून कुजलेल्या स्थितीत होता.सदर व्यक्ति मागील तीन चार दिवस त्या परिसरात फिरत असल्याचे बोलले जात असून याबाबतचा पुढील तपास देवगड पोलिस करीत आहेत.