सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ यांचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशनात चिमूर जि. चंद्रपूर येथे दै. प्रहारचे दोडामार्ग तालुका प्रतिनिधी सुहास देसाई यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या बद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्यांचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर उपाध्यक्ष संतोष राऊळ जेष्ठ पत्रकार संतोष वायगणकर, परिषद प्रतिंनीधी गणेश जेठे,अशोक करबलेकर रवी गावडे, महेश सरनाईक,संतोष सावंत, संदीप गावडे लवू महाडेश्वर, राजन नाईक आदी उपस्थित होते.
