कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले अखेर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना सांगितले त्यांनी विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधला आणि तात्काळ हा बॉक्स बदलण्यात आला त्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.
कविलकाटे येथे गणेश मंदिर आहे. या गणेश मंदिराजवळ विद्युत खांबा असून या विद्युत खांबावरील फ्युजचा बॉक्स गेले सहा महिने उघडा आहे. त्या ठिकाणी कोणताही अपघात होण्याची भीती होती. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका तसेच इतर लोकप्रतिनिधी यांना सांगण्यात आले. मात्र नागरिकांनी सांगितलेल्या या धोकादायक खांबा संदर्भात कोणीही गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या महायुतीच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांना ही बाब सांगण्यात आली. त्यांनी तात्काळ कुडाळ शहराचे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांना संपर्क साधला जर हा बॉक्स बदलण्यात आला नाही तर त्या ठिकाणी येऊ, तूम्हाला खर्च जमत नसेल तर आम्ही करू, कारण माघी गणेश जयंती जवळ येत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर खपवून घेतले जाणार नाही हे सांगितल्यावर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हा फ्युजचा बॉक्स बदलून त्या ठिकाणी नवीन बॉक्स लावण्यात आला. हा बॉक्स बसविल्यावर त्याची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केली. यावेळी गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी उपस्थित होते. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे अभिनंदन आणि कौतुक कविलकाटे नागरिकांकडून होत आहे.
