Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग

कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे बचावली. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल फर्नांडिस यांच्या घराजवळ गाईंचा गोठा आहे यामध्ये सुमारे ९ गाई आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास या गोठ्याला अचानक आग लागली ही आग रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने पाहिले आणि निहाल फर्नांडिस यांना सांगितले सुरुवातीला त्या ठिकाणच्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने आटोक्यात आणली. ही घटना समजतात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली यामध्ये कोणत्याही जनावराची हानी झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!