शक : १९४६, क्रोधी संवत्सर
अयन: उत्तरायण
ऋतू: सौर शिशिर ॠतू
मास : पौष
पक्ष : कृष्ण
तिथी : अमावास्या १८.०६ पर्यंत
नक्षत्र: उत्तराषाढा ८.२१ पर्यंत
योग : सिद्धि २१.२१ पर्यंत
करण : किंस्तुघ्न २९.११ पर्यंत
चंद्र राशी : मकर
रवि राशी : मकर
सूर्योदय: सकाळी ७.१५
सूर्यास्त : सायंकाळी ६.२९
राहूकाल: १२.५२ ते १४.१६
आजचे दिनविशेष
आज अमावास्या तिथी वर्ज्य आहे.
शास्त्रार्थ
१) अन्वाधान : संस्कृत भाषेत, अन्वाधान म्हणजे अग्निहोत्र (हवन किंवा होम) केल्यानंतर पवित्र अग्नी प्रज्वलित ठेवण्यासाठी इंधन घालणे. हवनानंतर अग्नी तेवत राहावा याची काळजी घेतली जाते.या दिवशी वैष्णव पंथाचे लोक एक दिवसाचे व्रत पाळतात आणि हा विधी करतात. प्रत्येक मासात दोन वेळा अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना अन्वाधान असते. इष्टीपूर्वी अन्वाधान पाळले जाते.
२) पौष अमावास्या (मौनी अमावास्या): पौष अमावास्येला ‘मौनी अमावस्या’ असे म्हटले जाते. या दिवशी पितरांचे स्मरण करुन पिंडदानाचा विधी केला जातो. त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते. मौनी अमावास्येला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. पौष अमावास्या २९. १.२०२५ या दिवशी सायंकाळी ०६ वाजून ०६ मिनिटापर्यंत आहे. मौन साधल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो.
३) कुंभमेळा प्रयागक्षेत्री
(संदर्भ : दाते पंचांग)
सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) – फोन नं. ९८२२६६७७५६
