कसाल शासकीय विश्रामगृहात शासकीय कार्यालयाचा घाट

0

कसाल बसस्थानकाच्या शेजारी आणि मोक्याच्या ठिकाणी बाजारभावानुसार करोडो रुपये किंमत असलेल्या सन- १९२७ रोजी पायाभरणी झालेल्या कसाल शासकीय विश्रामगृहाच्या नशिबात दगडधोंडे येत आहेत ( काॅलेटी कंट्रोल लॅब ) कसालच्या विश्रामगृहावर कसाल वसियांना,लहान मुलांना,थकलेल्या वृद्ध शरिराला आपले क्षण मोकळे पणाने जगता यावेत एखाद्या गार्डन ची निर्मिती व्हावी किंवा कुडाळ तालुक्यातील गावाच्या नागरीकांना कुठल्याही कार्यालयीन कामकाजसाठी तालुक्याच्या ठिकाणी हालपाटे मारावे लागता या करीता एखादे मध्यवर्ती कार्यालय मिळावे या करीता कसाल वासियांचे प्रयत्न सुरू असताना कसाल विश्रामगृह ज्या प्रशासनाच्या अधिकारत आहे त्या प्रशासनाचा काॅलेटी कंट्रोल लॅब हि मुख्य इमारतीत मध्यभागी बांधण्याचा अट्टाहास का..? कसाल विश्रामगृहाच्या परिसरात आजुबाजुला ईमारती आहेत त्या ईमारीती मध्ये काॅलेटी कंट्रोल लॅब हि कुठे ही जागेचे नियोजन करून बांधण्याबाबत कुठलाही विरोध नक्कीच नाही…!! पण कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता मध्य भागी हि लॅब उभारून काय साध्य करायचे आहे. की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ह्रदय असणाऱ्या कसाल गावच्या पदरात दगडधोंडेच घालायचे आहेत. माझे हे लिखाण महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे आणि आमचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार‌श्री.निलेश नारायणराव राणे यांच्या पर्यंत पोहचत असेल तर या प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष कसाल विश्रामगृहाच्या जागेवर भेट देऊन कुठलेही नियोजन नकरता करत असलेले बांधकाम थांबवून आपल्या कल्पनेनुसार या करोडो रुपये किंमत असलेल्या जागेचा विकासात्मक आराखडा तयार करून त्या संबंधित सत्वर कार्यवाही करावी कसाल वासिय आपल्या सदैव ऋणात राहतील

जागृत नागरिक 

कु.साईनाथ प्रभाकर आंबेरकर

 मु.पो.कसाल बाजारपेठ 

मो.बा.९४०३६३६४५४