कुडाळ | प्रतिनिधी
वीज ग्राहकांना डोकेदुखी ठरणाऱ्या अदानी समुहाच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात जिल्ह्यातील महाविकास आघाडी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून आज सोमवारी महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चाने स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केला यावेळी अदानी ग्रुपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली
महावितरणने अधीक्षक कार्यालयात अदानी ग्रुपला दिलेले टेबल खुर्च्या काढून घ्याव्यात अशी ही मागणी करण्यात आली पत्र मिळेपर्यंत मोर्चेकरी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठाण मांडून होते पत्र मिळाल्यानंतर एकजुटीचा जय जय कार करीत धडक मोर्चा स्थगित करण्यात आला. कुडाळ कॉलेज रोड ते अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात माजी आमदखर वैभव नाईक, संदेश पारकर, संपत देसाई, मंगेश तळवणेकर, दीपक कदम, इर्शाद शेख, अभय शिरसाट, राजन नाईक, निलेश तिरोडकर , अतुल बंगे आदी राजकीय कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी स्वीकारले.
