कुडाळ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील डी. के. स्पोर्ट्स आयोजित शहर मर्यादित कुडाळ प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाला. कुडाळ तहसील कार्यालया नजीक असलेल्या शासकीय मैदानावर ९ फेब्रुवारी पर्यंत ही क्रिकेट स्पर्धा सुरू राहणार आहे. 

कुडाळ शहरातील डी. के. स्पोर्ट्सच्या वतीने कुडाळ शहर मर्यादित कुडाळ प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ८ संघमालक असून ७ व ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यांमधून ९ फेब्रुवारी रोजी उपांत्य व अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे तसेच दिलीप जाधव, लक्ष्मण कुडाळकर, डी. के. स्पोर्ट्स खेळाडू संघ मालक उपस्थित होते. 

यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळा कुठेही वाद होतील किंवा स्पर्धेला गालबोट लागेल असे काही करू नका. स्पर्धा आपल्या शहरातील खेळाडूंची आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले की, डि. के. स्पोर्ट्सचे आयोजन हे अप्रतिम असते. त्यांनी यापूर्वी विविध स्पर्धा घेतले आहेत. आम्ही त्या पाहिल्या आहेत. त्यांचे वाखाणण्याजोगे आयोजन असते. सर्व खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यामुळे कुडाळ शहर एकत्र झाले आहे हे दिसून येत आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी निवेदन योगेश पेंडुरकर यांनी केले.