धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही : आमदार निलेश राणे

0

कुडाळ | प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून धर्मवीर ज्वाला कुडाळ येथे आली होती या धर्मवीर ज्वालेला आमदार निलेश राणे यांनी अभिवादन केल्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सावंत, उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, गणेश भोगटे तसेच राजू राऊळ, विवेक पंडित, रमा नाईक, वैद्य सुविनय दामले आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले पण आपण धर्मासाठी किती सतर्क आहोत हे प्रत्येकाला माहिती आहे एक दिवस रॅली काढून चालणार नाही तर सातत्याने आपल्या धर्मासाठी सतर्क राहणे हे आपले कर्तव्य आहे. दिवसा ढवळ्या गोहत्या होत आहेत त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिला पाहिजे आता कुणालाही सोडून चालणार नाही. ते आता अंगावर येत आहेत आपण सुद्धा त्यांना सोडलं नाही पाहिजे असे सांगून आपला धर्म आपणच जपला पाहिजे त्यांच्याजवळ अनेक देश आहेत पण आपल्याजवळ हिंदू राष्ट्र म्हणून एकच आहे त्यामुळे आपला धर्म जगला पाहिजे त्यासाठी आपण सातत्याने सतर्क राहून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.