वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे उद्घाटन
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन
कुडाळ प्रतिनिधी
वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथे बस थांबा नसल्यामुळे ग्रामस्थांची फार गैरसोय होत होती. अनेकदा कामानिमित्त किंवा बाजारासाठी कुडाळला जायचे असल्यास एस. टी. बस पकडताना फार कसरत व्हायची. ही बाब ग्रामस्थांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या कानावर घातली. आनंद शिरवलकर यांनी स्वतः पाठपुरावा करून बस थांबा मंजूर करून आणला. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून या बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाईक भाऊजी, अवधूत सामंत, आरिफ मुजावर, निलेश कुबल, दिनेश शिरवलकर, मुन्ना चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय दूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद शिरवलकर यांचे आभार मानले.
