गुढीपाडव्या निमित्त रविवारी सायंकाळी कुडाळ शहरात स्वागत यात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत..
कुडाळ प्रतिनिधी
गुढीपाडव्या निमित्त रविवारी सायंकाळी कुडाळ शहरात स्वागत यात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. कुडाळ शहरातील वासिय व सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी सायंकाळी येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथून या स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. भारत मातेची पालखी घेऊन ढोलताशांच्या गजरात, पारंपारीक वेशभुषेत छत्रपती शिवाजी महाराज नगर, समादेवी मंदिर, ओटवणेकरतिठा, पानबाजार, परत समादेवी मंदीर मार्गे मारूती मंदीर, मुख्य बाजारपेठ, गांधीचौक येथून राजमाता जिजाऊ चौक अशी हि स्वागत यात्रा काढण्यात आली. या स्वागत यात्रेत पारंपारीक पोषाखात नागरीक सहभागी झाले होते. ढोलवादन, फटाक्यांची आतषबाजी आणि हिंदू नववर्षाचा जयघोष करण्यात आला. श्रीराम, लक्ष्मण आणि सिता वेषभूषा साकारलेला चित्ररथही सहभागी झाला होता. शहरातील विविध मंडळे या स्वागत यात्रेत सहभागी झाली होती.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, संजय भोगटे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजपाचे राजू राऊळ, दादा साईल, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, अभिषेक गावडे, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुकाप्रमुख अरविंद करालकर, युवा सेनेचे चेतन पडते, शहर प्रमुख रोहित भोगटे, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी सरपंच नागेश परब, अवधूत सामंत, प्रसन्न गंगावणे, प्रवक्ते रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.
ही स्वागत यात्रा संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत काढण्यात आली यामध्ये नेरूर व गोवा येथील देखावे सादर करण्यात आले नेरूर येथील गणेशाचा देखावा तर गोवा येथील कलाकारांनी विश्व निर्मितीचा देखावा सादर केला हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
