मालवण तालुक्यातील खोटले गावात अंदर बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन करण्यात आली धडक कारवाई

0

मालवण तालुक्यातील खोटले गावात अंदर बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन करण्यात आली धडक कारवाई

मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी जुगार, दारु व अवैध धंद्यांबाबत माहीती घेवून परिणामकारक कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.

त्याअनुषंगाने मा. श्री. कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदे व तत्सम बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे उपविभाग सावंतवाडी व कणकवली येथे अवैध धंद्यांविरुध्द पोलीस विभागाकडुन कठोर कारवाई सुरू आहे.

दि. 01.04.2025 रोजी मालवण तालुक्यातील मौजे खोटले गावांतील धनगरवाडी डोंगराळ भागातील माळरानावर चोरुन अंदर बाहर जुगार सुरु असलेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहीती मिळालेवरुन श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली रात्रौ 01.10 वाजताचे मानाने छापा टाकून अंदर-बाहर जुगार खेळ खेळत असलेल्या 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असुन इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळुन गेलेले आहेत. अंदर-बाहर जुगार खेळण्यासाठी आलेल्या आरोपींमध्ये अनुक्रमे 1. गुरुनाथ साबाजी नाईक, वय-22, रा. आरोस, ता. सावंतवाडी, 2. रामचंद्र सदाशिव गुरसाळे, वय-63, रा. पटकीदेवीजवळ, ता. कणकवली, 3. महेश सुंदर आंबेरकर, वय-40, रा. ऑफीस बिल्डींग, ता. कणकवली, 4. संजय श्रीधर साळगांवकर, वय-50, रा. कट्टा, ता. मालवण, 5. गणेश सोमा पालव, वय-37, रा. मसुरे, ता. मालवण, 6. बाळकृष्ण पांडुरंग वर्दम, वय-68, रा. सातोसे, ता. सावंतवाडी7. संतोष बाळकृष्ण कुडतरकर, वय- 53, रा. माणगांव, ता. कुडाळ, 8सुरेश श्रीधर कवठणकर, वय- 52, रा. कवठणी, ता. सावंतवाडी, 9. रोहीत राजेंद्र गराटे, वय-29, रा. कासाडे, ता. कणकवली, 10. भिमसेन तुळजाराम इंगळे, वय-41, रा. कलमठ, ता. कणकवली, 11. प्रशांत प्रकाश चव्हाण, वय-40, रा. मसुरे ता. मालवण, 12. तुषार नंदकुमार मसुरकर, वय-34, रा. कलमठ, ता. कणकवली, 13. अक्षय नारायण चव्हाण, वय 35रा. कुमामे, ता. मालवण, 14. संदिप गोळवणकर, रा. कांबळेगल्लो, ता. कणकवली15. तुकाराम खरात, रा. कलमठ, ता. कणकवली यांचेकडून अंदर-बाहर पट जुगारावरील रोख रक्कम, जुगाराचे साहीत्य असे 1,43,390/- (एक लाख त्रेचाळीस हजार तिनशे नव्वद रुपये) तसेच मोबाईल फोन, 01 मोटार सायकल व 04 नविन चारचाकी वाहनांची मिळुन एकुण 37,58,690/- (सदतीस लाख अठ्ठावण्ण हजार सहाशे नव्वद रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरबाबत मालवण पोलीस ठाणे गु.र.नं. 49/2025महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. श्री. कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. समिर भोसले, श्री. सुधीर सावंत व श्री. रामचंद्र शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, गुरुनाथ कॉयडे, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल – सदानंद राणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाईबस्त्याव डिसोझा, आशिष जामदार व चंद्रकांत पालकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे पथकाने एकत्रितरित्या केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलीस करीत आहेत.यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाचप्रकारे जुगार, मटका, दारु, अंमली पदार्थ किंवा तत्सम अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींबाबत गोपनीय माहीती घेवून कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली