माडयाचीवाडी येथील स्वामी मंदिराचा कलश पूजन सोहळा व मूर्ती पुन: प्रतिष्ठापना सोहळा बुधवार २ एप्रिल रोजी..

0

माडयाचीवाडी येथील स्वामी मंदिराचा कलश पूजन सोहळा व मूर्ती पुन: प्रतिष्ठापना सोहळा बुधवार २ एप्रिल रोजी..

 

कुडाळ प्रतिनिधी

माडयाचीवाडी येथील स्वामी मंदिराचा कलश पूजन सोहळा व मूर्ती पुन: प्रतिष्ठापना सोहळा उद्या बुधवार २ एप्रिल रोजी सकाळी ५ वा. संपन्न होणार आहे तसेच ६ एप्रिल रोजी आध्यात्मिक सद्गुरु श्री श्री १०८ महंत मताधिश प. पू. श्री श्री गावडे काका महाराज यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

‎माडयाचीवाडी येथील मंदिर बांधकाम अवघ्या तीन महिन्यात  पूर्ण झाले असून, कृष्णशीला दगडामध्ये श्री स्वामी समर्थांची चैतन्यरुपी मूर्ती साकारली आहे. उदक शांती गणहोमने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुढीपाडवा दिवशी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक श्री देव गावडोबा मंदिर ते स्वामी मंदिर माडयाचीवाडी पर्यंत काढण्यात आली.

‎सोमवारी स्वामी प्रकट दिनी (स्वामी पादुकांवर अभिषेक), सकाळी देवतांना निमंत्रण, स्वस्ती वाचन, संभारदान, जल अधिवास, आचार्य वरण, पीठ देवता स्थापना व पूजन, दुपारी महाप्रसाद सायं. पालखी मिरवणूक सोहळा झाला. मंगळवार १ एप्रिल रोजी स. ८.३० वा. आवाहीत देवता पूजन, होम हवन, प्राकार पौष्यण, पर्याय हवन, दु.१.३० वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. पारंपारीक फुगडी, रात्री ८ वा. श्री बावळेवर नाट्य मंडळ तेंडोली यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘अयोध्याधीश श्रीराम’, बुधवार २ रोजी स.८.३० वा. कलश पूजन व श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती प्रतिष्ठापना, दु. १ वा. महाआरती व महाप्रसाद, सायं. ६.३० वा. भजने, यामध्ये महापुरुष भजन

‎माडयाचीवाडी, श्री देव खळनाथ मंडळ, पिंगुळी, भगवती मंडळ-बाव, गुरुवार ३ रोजी स.९ वा. सामुदायीक अभिषेक, दु.१ वा. महाआरती व महाप्रसाद, सायं ४ वा. पाककला स्पर्धा (महिलांसाठी), सायं. ६ वा. गवळीवाडी मंडळ, कारिवडे यांचे भजन, रात्री ८ वा. हरिहर नातू यांचे कीर्तन, शुक्रबार ४ एप्रिल स. ९ वा. सामुदायिक अभिषेक, दु.१ वा. महाआरती व महाप्रसाद, सायं. ६.३० वा. किंजवडे येथील समईनृत्य, रात्री ८ वा. डबलबारी भजन सामना श्री लिंगेश्वर भजन मंडळ, भरणी बुवा विनोद चव्हाण व वर्दे कुडाळ येथील बुवा गुंडू सावंत यांच्यात होणार आहे. शनिवार ५ रोजी स.१० वा. श्री. सत्यनारायण महापूजा, दु.१ वा. महाआरती व महाप्रसाद सायं. ६.३० वा. स्वरबंदिश भजन मंडळ, वेंगुर्ले यांचे भजन, रात्रौ ८ वा. चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमीचा नृत्याविष्कार, रविवार ६ एप्रिल श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा, सकाळी ११ वा. औक्षण व संस्थेच्या शुभेच्छा स्वीकार, ११.३० वा. सत्कार सोहळा व बक्षीस वितरण, दुपारी १२ वा. सद्‌गुरू श्री गावडे काका महाराजांचे मार्गदर्शन, १ ते रात्रौ १० वा. पर्यंतः सद्‌गुरू दर्शन व आशीर्वाद सोहळा, दुपारी १.३० वा. पासून अखंड महाप्रसाद, दुपारी ३ वा. श्री सद्‌गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी भक्तिगीत गायन आदी कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी सिद्धेश किनळेकर, मनिष नाईक, एकनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री सद्‌गुरू भक्तसेवा न्यास माडयाचीवाडी यांनी केले आहे.