रिल्स मालवणी तर्फे उद्या मालवणी अवॉर्ड्स सोहळा – मालवणी भाषा दिनाचे औचित्य 

0

रिल्स मालवणी तर्फे उद्या मालवणी अवॉर्ड्स सोहळा – मालवणी भाषा दिनाचे औचित्य

 

कलासिंधु सन्मानाने गंगाराम गवाणकर यांचा होणार गौरव

 

कुडाळ प्रतिनिधी

सन्मान बोलीभाषेचो… अभिमान मालवणी माणसाचो, हि टॅग लाईन घेऊन रिल्स मालवणी यांच्या वतीने शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ रोजी भव्य मालवणी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मराठा समाज हॉल मध्ये सायंकाळी ७ वाजल्यापासून हा सोहळा रंगणार आहे. यावेळी कला सिंधू सन्मान २०२५ ने वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन रिल्स मालवणी कडून करण्यात आले आहे.

४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस. तो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रिल्स मालवणी यांच्या वतीने मालवणी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, नाटक, सिनेमा, मालिका, कलाकार याना मालवणी अवॉर्ड देऊन गौरविले जाते. यंदाचे हे या अवॉर्ड्स सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. यावेळी सुद्धा अनेक कलाकरांना रिल्स मालवणी अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने दशावतार या विषयवार आयोजित केलेल्या रिल्स तयार करण्याच्या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण सोहळा देखील होणार आहे.

यावेळी विविध कॅटेगिरी मध्ये मालवणी अवॉर्ड्स वितरित केले जाणार आहेत, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी रील या कॅटेगिरीचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन रिल्स मालवणीच्या वतीने करण्यात आले आहे.