गाळ घेऊन जाणाऱ्याला रॉयल्टी भरावी लागणार नाही हा निर्णय कौतुकास्पद आमदार निलेश राणे

0

गाळ घेऊन जाणाऱ्याला रॉयल्टी भरावी लागणार नाही हा निर्णय कौतुकास्पद आमदार निलेश राणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गाळ उपसा शुभारंभ आमदार निलेश राणे यांचे हस्ते संपन्न

कोकणासाठी गाळ हे मोठे संकट आहे

कुडाळ प्रतिनिधी
नदी नाल्यांमध्ये गाळ साचणे हे कोकणासाठी मोठे संकट निर्माण झाले आहे‌ हा गाळ गेले अनेक वर्ष काढला गेल्या नसल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते असे आमदार निलेश राणे यांनी सांगून हा विषय पालकमंत्री नितेश राणे यांनी गांभीर्याने घेऊन गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेतली त्यामुळे पूरबाधित गावांना दिलासा मिळाला आहे असे सांगून याला कोणतीही रॉयल्टी लागणार नाही असे त्यांनी कुडाळ येथे गाळ उपसा शुभारंभ प्रसंगी सांगितले.
जलसंपदा विभाग, जलसंधारण व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नाल्यातील गाळ काढणे व ख्रिश्चनवाडी ओरोस येथील नदी मधील गाळ काढणे याचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे गो. ह. श्रीमंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रृती वर्दम, दादा साईल, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग रत्नागिरीचे ध.श्री.साहुत्रे, मार्गदर्शक नाम फाउंडेशनचे राजीव सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी नाम फाउंडेशनचे गणेश थोरात, तालुका प्रमुख अरविंद करलकर, रोहित भोगटे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगरसेविका सरोज जाधव यांच्या सह भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की गाळ निर्माण होणे हे संकट मोठे आहे याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे होते ती पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेतली. आणि हा गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनने जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचेही आम्ही कौतुक करत आहोत. असे सांगून जिल्हाधिकारी यांनी हा गाळ घेऊन जाणाऱ्याला कोणतीही रॉयल्टी असणार नाही असे सांगितले ही चांगली बाब आहे मात्र त्या ठिकाणी वाद न होता जो कोणी गाळ घेऊन जात असेल त्याची शासन दप्तरी नोंद असणे गरजेचे आहे.

शिवापूर ते देवबाग पर्यंत गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की माझ्या मतदारसंघांमध्ये शिवापुर ते देवबाग हा असा भाग आहे की तो उतरता आहे पुढील शंभर वर्षासाठी या मार्गावर गाळ साचणे अशी योजना बनवणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची मदत घ्यावी लागेल त्यासाठी खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यामार्फत राज्याची जी काही मदत आहे ती मिळवून द्यायला तयार आहोत. असे सांगितले.