*खा. नारायण राणेंना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक टीमनेदिल्या शुभेच्छा*
*कणकवली, दि- ११*
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव सुशील चमणकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, डॉ. तुषार भोसले, जिल्हा प्रतिनिधी रोहन परब, सचिन पेडणेकर, चंद्रशेखर मांजरेकर, कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, केदार खोत, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, नितीश सावंत आदी उपस्थित होते.
