कुडाळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन …

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले कुडाळ तहसील कार्यालय नजीक हे कार्यालय बांधण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय कुडाळ येथे नव्याने उभारण्यात आले आहे याचे उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी नंदकिशोर रेड्डी, सहाय्यक वनरक्षक डॉ. सुनील लाड, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार तसेच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगते जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरे माजी सभापती मोहन सावंत, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी सरपंच नागेश परब, रेवती राणे आदी उपस्थित होते.


