सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याचा खून झाल्याचे उघड ..
खून केल्याप्रकरणी कुडाळ येथील सिद्धेश शिरसाट यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील चेंदवन नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर याला ठार मारून कासार्डा येथील स्मशानभूमीत दहन केल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपींनी दिल्यामुळे या आरोपीविरुद्ध कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील चेंदवन नाईक वाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिरवलकर याचे अपहरण केल्याप्रकरणी कुडाळ येथील सिद्धेश अशोक शिरसाट, माणगाव येथील गणेश कृष्णा नार्वेकर, सातार्डा येथील सर्वेश भास्कर केरकर व कुडाळ येथील अमोल श्रीरंग शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले होती दरम्यान या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी केलेल्या तपासात घडलेल्या घटनेचा उलघडा झाला.
आर्थिक व्यवहारावरून झाली मारहाण
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा सिद्धेश शिरसाट याच्याजवळ कामाला होता तो सिद्धेश शिरसाट व गणेश नार्वेकर याचे पैसे देणे होता या रागातून या सर्वांनी त्याला मार्च २०२३ मध्ये चेंदवण येथील त्याच्या घरून गाडीत बसून कुडाळ येथे तो राहत असलेल्या अमोल शिरसाट यांच्या खोलीमध्ये आणले आणि त्या ठिकाणी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत सिध्दीविनायक बिडवलकर हा गंभीर जखमी झाला होता.
त्यांना ‘तो’ मयत झाल्याचे समजले
या मारहाणीत सिद्धिविनायक बिडवलकर हा गंभीर जखमी झाला त्याला मारहाण केल्यानंतर ते सर्वजण जेवणासाठी बाहेर गेले जेवण करून आल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायक बिडवलकर याला जाग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो मयत झाला आहे. मयत झाल्यामुळे त्यांची पाचवर धारण बसली. आता त्याला ठिकाणी लावलं पाहिजे हे विचार त्यांच्या मनात आले त्याचा मृतदेह घेऊन ते सातार्डा येथे गेले.
सातार्डा येथील स्मशानभूमी त्याला केले दहन
सिद्धिविनायक बिडवलकर याचा मृतदेह सातार्डा येथील स्मशानभूमीत घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्याचे दहन केले दहन झाल्यानंतर ती राख जवळच्या नदीमध्ये टाकून दिली अशी कबुली या प्रकरणातील संशयित आरोपी यांनी दिली त्यांच्या कबुली वरून कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा चौघांवर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहेत.
