बांधकामाच्या ठिकाणच्या १७२ सेंट्रींगच्या प्लेटा व एमआयडीसी येथे सुरू असलेल्या विहिरीच्या कामाच्या १२५ सेंट्रींगच्या प्लेटा चोरणारी गॅंग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात..

0

कुडाळ प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणच्या १७२ सेंट्रींगच्या प्लेटा व एमआयडीसी येथे सुरू असलेल्या विहिरीच्या कामाच्या १२५ सेंट्रींगच्या प्लेटा चोरणारी गॅंग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल असून उद्या बुधवारी १६ एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील सेंट्रींगच्या प्लेटा चोरून घेऊन जाणारी गॅंग पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या गॅंगने कुठे कुठे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत त्या सांगितल्या दरम्यान कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील हॉटेल पॅलेस समोरील इमारतीचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सेंट्रींगच्या १७२ प्लेटा होत्या. या प्लेटा चोरीला गेल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल होती तसेच कुडाळ एमआयडीसी येथे सुरू असलेल्या विहिरीच्या कामाच्या ठिकाणी १२५ सेंट्रींगच्या प्लेटा होत्या त्या सुद्धा चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. या दोन्ही ठिकाणी या गँगने चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडलेल्या सनी सत्यवान पवार (वय ४२, रा. कोलगाव, सावंतवाडी), अमित मधुकर मुंज (वय ४२ रा.;माणगाव, कुडाळ), आयान जुबेर शेख (वय २० रा. सालईवाडा, सावंतवाडी), अली साबीर खान (वय २१ कोलगाव, सावंतवाडी), अतिफ सिराज काजरेकर (वय २० सालईवाडा, सावंतवाडी) हे या प्रकरणातील सेंट्रींगच्या प्लेटा चोरणारे असून या प्लेटा कणकवली कुंभारवाडी येथील विजय मारप्पा इंगळे यांना ते विकत होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सहा जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली उद्या बुधवार १६ एप्रिल रोजी चोरी प्रकरणी त्यांना कुडाळ न्यायालयात हजर केले जाणार आहे.