कुडाळ येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

0

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्थानिक रहिवाशांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुडा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व स्तरातील नागरिकांनी जयंती साजरी केली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील स्थानिक रहिवाशांच्या वतीने सुद्धा जयंती साजरी करण्यात आली यावेळी जय भीम युवक मंडळाचे माजी अध्यक्ष विजय धर्माजी जाधव, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर, ज्येष्ठ नागरिक आत्माराम जाधव, नगरसेवक विलास कुडाळकर, माजी नगरसेविका सरोज जाधव, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष सुशीला कुडाळकर, तसेच यशवंत कुडाळकर, आनंद पेंडुरकर, राजेश कुडाळकर, रजनीकांत कदम, देविदास जाधव, अरुण कुडाळकर, संतोष जाधव, जनार्दन कुडाळकर, निलेश कुडाळकर, जनार्दन कुडाळकर आदी उपस्थित होते.

 

कुडाळ नगरपंचायतीचे मानले आभार

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेली जागा ही शासकीय असल्यामुळे या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीने जयंती निमित्त मंडपची उभारणी केली ही मंडपची उभारणी केल्याबद्दल जय भीम युवक मंडळाचे माजी अध्यक्ष विजय धर्माजी जाधव यांनी नगरपंचायतीसह तहसील पोलीस विभाग यांचे आभार मानले.

 

फोटो महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील स्थानिक रहिवाशी