मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळप नाका येथील ओव्हरब्रिजवर आज, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकी आणि रोलर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

0

कुडाळ: प्रतिनिधी 

मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळप नाका येथील ओव्हरब्रिजवर आज, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकी आणि रोलर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यावेळी अधिक उपचारासाठी जखमी दुचाकीस्वार याला गोवा- बांबुळी येथे नेण्यात आले आहे.

   प्राप्त माहितीनुसार, वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील रहिवाशी रवींद्र बागकर (वय ६०) हे निवृत जिल्हा बँक कर्मचारी आहेत. आज सकाळी ते ओरोस येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात निघाले असता कुडाळ ओव्हर ब्रीजवर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ती पुढे जात असलेल्या दुचाकीवर आदळली. यात रविंद्र बागकर हे दुचाकीवरून आदळले. यामुळे त्यांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यावेळी तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. मात्र, बागकर यांना गंभीर जखमी होते. त्यावेळी बागकर यांना श्वसनांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ गोवा-बांबुळी येथे नेण्यात आले.