कुडाळ प्रतिनिधी
चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी अजून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील अनिकेत गावडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता १९ एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावले आहे या खून प्रकरणांमध्ये अनिकेत गावडे यांनी आरोपींना मदत केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात पोलिसांना अजून काही धागेदोरे सापडत आहेत त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणांमध्ये मृतदेह घेऊन जाण्यासाठी तसेच आरोपींना घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था अनिकेत गावडे यांनी केली होती. भाड्याची गाडी अनिकेत गावडे यांनी घेऊन आला होता. त्यामध्ये मृतदेह ठेवण्यात आला होता. तसेच आरोपींसाठी वेगळी गाडी केली होती. त्या गाडीमध्ये अनिकेत गावडे यांच्या समवेत होता. त्यामुळे त्याला या घटनेची माहिती होती असे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी कुडाळ न्यायालयात सांगितल्यावर त्याला पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले त्यावरून न्यायालयाने अनिकेत गावडे याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच आरोपींना घेऊन जाण्यासाठी वापरलेली गाडी हस्तगत करायची आहे अनिकेत गावडे याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. यासाठी ही पोलीस कोठडी मागितली आहे दरम्यान या प्रकरणांमध्ये अजून काही जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.