Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कोंकण*चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक*

*चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक*

*चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल.*

*विमानतळ सुशोभीकरणासाठी dpdc मधून देणार मदत*

पालकमंत्री नितेश राणेंच्या फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश.

मुंबई | (प्रतिनिधी)

चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देत विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा गेल्या काही दिवसांपासून रखडली असून त्याचा मनस्ताप जिल्हावासियांना व पर्यटकांना सहन करावा लागतो.ही विमानसेवा निरंत सुरू व्हावी तसेच ही विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीला पालकमंत्री नितेश यांच्यासह फ्लाय 91 कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस,एअरपोर्ट हेड डायरेक्टर श्री कुलदीप सिंग,सिंधुदुर्ग एअरपोर्ट हेड कॅप्टन जय सदाना उपस्थीत होते.

या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चिपी विमानतळावरून मुंबई सेवा कुठल्याही स्थितीत अडथळे न येता सुरू करण्याचे निर्देश देत असतानाच त्यांच्या ही समस्या जाणून घेतल्या.त्यावर योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे पालकमंत्री यांनी आश्वासित करत प्रसंगी विमानवाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.तसेच चीपी विमानतळाचा परिसर सुशोभित करण्याची गरज असून त्यासाठी dpdc मधून हातभार लावला जाईल असे सांगितले. चिपी विमानतळावरून अन्य मार्गावर वाहतूक करण्याबाबत ही या बैठकीत चर्चा करण्यात आली.चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्या तर पर्यटन वाढीस चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!