Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन पैकी दोन जागा निवडून आल्या त्यामुळे इथल्या...

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन पैकी दोन जागा निवडून आल्या त्यामुळे इथल्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत…

एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे : दत्ता सामंत 

 

कुडाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे येत्या २४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर सायंकाळी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन पैकी दोन जागा निवडून आल्या. त्यामुळे इथल्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि उपनेते संजय आंग्रे यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळची उबाठा पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील पण महायुतीच्या धोरणाप्रमाणे मित्र पक्षातून कोणी शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत, असे यावेळी दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. 

     कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे हि पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला दत्ता सामंत आणि संजय आंग्रे यांच्या सह उप जिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, संजय पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, तालुका प्रमुख अरविंद करलकर, प्रवक्ते रत्नाकर जोशी, दादा साईल, देवेंद्र नाईक आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

      दत्ता सामंत म्हणाले, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेण्यात आली. आज कुडाळ मध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. सभेचे नियोजन करण्यात आले. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे. महाराष्ट्र मध्ये 2024 ला जे विधानसभेचे इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिले आहे. शिंदे साहेबांनी शिवसेनेचे उमेदवार उभे करून त्या ठिकाणी ५७ उमेदवार निवडून आले. शिवसेनेचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला होता. महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून हा सिंधुदुर्गातील सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती खुश आहे. शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली. असे अनेक उपक्रम शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या राज्यामध्ये चालू केले आणि ते त्यांनी पूर्णत्वास सुद्धा नेले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. महायुतीमध्ये तीन पैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेश राणे हे निवडून आल्यानंतर आज जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघांमध्ये या तीन-चार महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय जोमाने वाढताना दिसत आहे. त्याची प्रचिती म्हणून उद्याचा हा आभार मेळावा आहे. त्या मेळाव्याला सुद्धा शिवसेनेचे या जिल्ह्यातील ताकद पाहायला मिळेल. या सभेला अनेक मंत्री, आमदार आणि संपर्कप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे श्री. सामंत म्हणाले. 

 महाराष्ट्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा जिल्हा बालेकिल्ला म्हणून यापुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक सरपंच, कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. मात्र आमची महायुती असल्याने एकमेक्नाच्या पक्षातून कोणी प्रवेश करणार नाहीत असे दत्त सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

     संजय आंग्रे म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे २४ तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत, त्याचं स्वागत भव्य दिव्य करण्याचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मानस आहे. त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्यदिव्य असे त्यांचे स्वागत करायचे आहे आणि तसे नियोजन आम्ही केले आहे. एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आलेत त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुदुर्गात येत आहेत.या सभेसाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर माजी मंत्री तसेच आमदार दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे असे अनेक मंत्री या दौऱ्यात येणार आहेत. कमीत कमी 1500 च्या आसपासचे पक्षप्रवेश यावेळी होतील. पण भाजपचे असतील ते शिवसेनेत येणार नाहीत आणि शिवसेनेचे असतील तर ते भाजपात जाणार नाहीत. आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही, असे श्री. आंग्रे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!