Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळअंमली पदार्थ विकणारे गुन्हेगार, वाळू चोरीतील गुन्हेगार, अवैद्य दारू विकणारे गुन्हेगार यांच्यासोबत...

अंमली पदार्थ विकणारे गुन्हेगार, वाळू चोरीतील गुन्हेगार, अवैद्य दारू विकणारे गुन्हेगार यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आमदारकीच्या काळात सोबत : माजी नगरसेवक राकेश कांदे

कुडाळ | प्रतिनिधी 

अंमली पदार्थ विकणारे गुन्हेगार, वाळू चोरीतील गुन्हेगार, अवैद्य दारू विकणारे गुन्हेगार यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आमदारकीच्या काळात सोबत होते. हे छायाचित्राच्या माध्यमातून पुढे आले आहे. मग या अवैद्य धंद्यांना माजी आमदार वैभव नाईक यांचा आशीर्वाद होता की काय असा सवाल माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी उपस्थित करून माजी आमदार वैभव नाईक यांचे छायाचित्र विविध अवैद्य व्यवसायिकांसोबत असल्याचे पत्रकार परिषदेत दाखवून यापुढे माजी आमदार वैभव नाईक यांनी आमच्या नेत्यांवर आरोप केले तर गप्प बसणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला. 

माजी आमदार वैभव नाईक हे गेले अनेक दिवस आमदार निलेश राणे यांच्यावर आरोप करीत आहेत या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील लोकप्रतिनिधींनी महायुतीच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर उपस्थित होते. 

या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी सांगितले की, कोणी कोणासोबत छायाचित्र काढावे हा नियम नाही पण त्या छायाचित्रावरून राजकीय भांडवल करून आरोप प्रत्यारोप करणे हे राजकारणाच्या सीमा पलीकडचे आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी गेले अनेक वर्ष अशा मुद्द्यांवर राजकारण करून पोळी भाजली आहे. ज्याप्रमाणे वैभव नाईक जनतेसमोर छायाचित्र आणून आमदार निलेश राणे यांची बदनामी करत आहेत हे आम्ही खपवून घेणार नाही. माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदारकीच्या काळामध्ये अनेक अवैद्य व्यावसायिकांना आश्रय दिल्याचे उघड झाले आहे. अंमली पदार्थमध्ये गुन्हेगार असलेला त्यांचा कार्यकर्ता तसेच बिडवलकर खून प्रकरणात ज्याची गाडी वापरली गेली तो वैभव नाईक सोबत आहेत. दारू व्यवसायिकांसोबत वैभव नाईकांचे फोटो आहेत या अवैद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा आका हे वैभव नाईक होते की काय असा सवाल उपस्थित करून वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमदार निलेश राणे ज्या वेगाने या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत त्यांची अधिवेशनातील कामगिरी ही सर्वांना भावत आहे त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक हे गडबडले आहेत कारण गेल्या दहा वर्षात फक्त बारसे, म्हाळवस अशा जेवणावळींसाठी जाणारे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हातून एकही विधायक काम झालेले नाही वैभव नाईक यांच्यासोबत कोणकोणत्या धंद्यातील माणसे आहेत हे आम्हाला माहीत आहेत त्यांची छायाचित्र वेळ आल्यावर दाखवू असे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी सांगून यापुढे आमच्या नेत्यांवर आरोप कराल तर आम्ही गप्प राहणार नाही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!