Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कोंकणवेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव – ‘वेंगुर्ला व्हिजन 2047’ निबंध स्पर्धा

वेंगुर्ला नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव – ‘वेंगुर्ला व्हिजन 2047’ निबंध स्पर्धा

वेंगुर्ला नगरपरिषद दिनांक 25 मे 2025 रोजी आपला शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक, असा लौकिक असलेली ही नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. वेंगुर्ला शहराने स्वच्छतेमध्ये सातत्याने अव्वल क्रमांक मिळवला आहे. यामागे प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच जागरूक आणि सहकार्यशील नागरिक यांचे मोठे योगदान आहे.

आपण भारतवासीय 2047 साली स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे, वेंगुर्ला नगरपरिषदेचाही शतकोत्तर अमृत महोत्सवी टप्पा जवळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहराचे भविष्यकालीन व्हिजन काय असावे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने ‘वेंगुर्ला व्हिजन 2047 – शहर विकासात वेंगुर्ला नगरपरिषदेकडून अपेक्षा आणि माझे योगदान’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी खुली असून, वेंगुर्ला शहरावर प्रेम करणारा कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. निबंध 500 ते 700 शब्दांच्या मर्यादेत असावा. स्पर्धकांनी आपले निबंध 15 मे 2025 पूर्वी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने पाठवावेत:

• पोस्टद्वारे/प्रत्यक्ष:

मुख्याधिकारी, नगरपरिषद, वेंगुर्ला

लिफाफ्यावर विजन 2047 निबंध स्पर्धा असे स्पष्ट नमूद करावे

• ई-मेलद्वारे (युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करून covengurle@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा)

पारितोषिक विजेत्या प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना आकर्षक बक्षिसे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येतील. प्रथम क्रमांक रुपये.5000/- , द्वितीय क्रमांक.3000/- रुपये तृतीय क्रमांक. 2000/- रुपये व उत्तेजनार्थ.1000/- अशी पारितोषिके आहेत

;सर्व व्हिजनरी नागरिक , विद्यार्थी ,गृहिणी अशा सर्वांनी आपले विचार आणि स्वप्ने मांडावीत, जेणेकरून वेंगुर्ल्याचा विकास लोकसहभागातून अधिक गतिमान होईल, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!