कुडाळ | प्रतिनिधी
मठ सिद्धार्थ नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ४ मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे.
या स्पर्धेमधील लहान गट १२ वर्षा पर्यंत तर मोठा गट १३ वर्षाच्यावर असे असणार आहेत. यातील मोठा गटांसाठी बक्षिसे प्रथम क्रमांक रोख रक्कम ३ हजार व चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम २ हजार व चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम १ हजार व चषक, उत्तेजनार्त रोख रक्कम ७०० व चषक, लहान गटासाठी बक्षिसे प्रथम क्रमांक रोख रक्कम २ हजार व चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम १हजार ५०० व चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम १ज्ञहजार व चषक, उत्तेजनर्थ ५०० व चषक अशी बक्षिसे आहेत तरी या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर स्पर्धेसाठी मंदार मठकर (९४०५१६८१७६), स्वप्नील मठकर (९४२०८५७७७०) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.