कुडाळ | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, गृहखाते एआय प्रणालीने कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून एक मे रोजी देशातील पहिला जिल्हा हा शासकीय विभागात प्रणाली वापरणारा जिल्हा असेल असे मत्स्य व्यवसाय बंदर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग व नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे कॉफी विथ स्टुडन्ट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शैलेंद्र पै, अदिती पै, बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, प्राचार्य बांदेकर, प्राचार्य भंडारी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर उपस्थित होत्या.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, या शिक्षण संस्थेचा कारभार चांगला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण दर्जेदार आहे या त्यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या संस्थेला असलेल्या अडचणी निर्माण होणारे प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन या ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन असे सांगून पूर्वी या ठिकाणची जनता रस्ते, विज, पाणी हे प्रश्न घेऊन येत होते पण आता शिक्षणाकडे सर्वांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे आपली शाळा डिजिटल व्हावी अशी निवेदने अनेक येत आहे ही खरी अभिमानास्पद गोष्ट आहे. आताच युगे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शासकीय कार्यालयांमध्ये एआय प्रणालीचा वापर केला जाणार आहे देशातील पहिला सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय कार्यालयांमध्ये एआय प्रणालीचा वापर करणारा जिल्हा असणार आहे असे सांगितले. आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या प्रणालीचा वापर होणार आहे त्यामुळे या संदर्भातील प्रशिक्षण देणारे कोर्सेस सुद्धा सुरू करण्यात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे गुणगौरव सुद्धा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.