कुडाळ | प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम ही काळाची गरज बनली आहे .हाच महामंत्र घेत पिंगुळी येथील गिअर अप जिमच्या दुसऱ्या शाखेचे गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटरचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी कुडाळेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स दुसरा मजला, पोस्ट कार्यालयनजिक कुडाळ येथे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अँड संग्राम देसाई यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता होणार आहे .यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, पंचायत समिती कुडाळ गटविकास अधिकारी वासुदेव नाईक कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, नगरसेवक , सिंधूरत्न प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष हेमंत जाधव , सचिव अनुप्रिया जाधव ,खजिनदार पूजा जाधव, यांच्यासह लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉक्टर्स आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नवीन सुरू होणाऱ्या गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर मध्ये अद्ययावत मशीनरी कार्यरत असणार आहे. व्यायामाबरोबरच स्टीम, कार्डिओ, मसाज सेंटर ,फिजिओथेरपी सप्लीमेंट न्यूट्रिशन ,शॉवर या सुविधा असणार आहेत. विशेष म्हणजे फिजिओथेरपी म्हणून डॉ सुरज शुक्ला, डॉ शरावती शेट्टी कार्यरत राहणार आहेत. त्याशिवाय योगा व झुंब्बा हे सुद्धा या ठिकाणी केले जाणार आहे. पिंगुळी येथे सुरू करण्यात आलेल्या जिमला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुडाळ शहरांमध्ये ही सेवा देता यावी या अनुषंगाने सिंधुरत्न प्रबोधिनीच्या माध्यमातून गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. भविष्यात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाबरोबरच, राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आमची जिम ही सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रातही मदतीसाठी नेहमीच कार्यरत राहिली आहे, भविष्यातही राहणार असल्याचे सिंधू रत्न प्रबोधिनीचे अध्यक्ष साईराज जाधव यांनी सांगितले