कुडाळ | प्रतिनिधी
चोरी, घरफोडी, दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पिंगळी येथील नदीम अब्दुल रहमान याला कुडाळ पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले आहेत त्याला कोल्हापूर सीमेवर कुडाळ पोलीस सोडून आले आहे
नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. काही समाजकंटक सराईत गुन्हेगार यांचे पासून नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण व्हावे याकरिता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री त्रषिकेश रावले यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख यांना आदेशित केले होते
कुडाळ पोलिसांच्या हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार नदीम अब्दुल रहमान शेख (रा. पिंगुळी) यांचेवर चोरी, घरफोडी, दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल होते त्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. सदर सराईत गुन्हेगारापासून भविष्यात गंभीर गुन्हे घडू नये याकरिता त्यास पायबंद घालणे जरुरीचे होते. याकरिता कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मगदूम यांनी सदर इसमास महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दोन वर्षांकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून हद्दपार करणे बाबत चा प्रस्ताव कुडाळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पाठवलेले हद्दपार प्रस्तावाची सुनावणी कुडाळ उपविभागीय दंडाधिकारी यांचे कडे होऊन त्यांनी नमूद सराईत गुन्हेगारास सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून दोन वर्षाकरित्ता हद्दपार करणे बाबतचा आदेश पारित केला त्याप्रमाणे सदर आदेशाची अंमलबजावणी करून सदर गुन्हेगारास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करून त्याला कोल्हापुर जिल्ह्यात आज दि. २७. एप्रिल २०२५ रोजी पाठविण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री त्रषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुडाळ श्री राजेंद्र मगदूम, पोलिस अंमलदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, कृष्णा परूळेकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आहेर यांनी केलेली आहे
कुडाळ पोलीस ठाणे अभिलेखावर ज्या इसमांवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध बाबतचे गुन्हे दाखल आहेत व त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही अशा गुन्हेगारांचे अभिलेखाचे पडताळणी करून नमूद इसमांवर अशाप्रकारे कारवाई करण्याचे सातत्य ठेवण्यात येणार आहे.


