सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका)
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.45 वाजता ओरोस परेड ग्राउंड येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जिल्हा गुंतवणूक शिखर परिषदेस उपस्थिती (स्थळ:- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या शेजारी, सिंधुदुर्ग), दुपारी 4 वाजता जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह, ओरोस, सिंधुदुर्ग), सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट (स्थळ:- ओरोस, सिंधुदुर्ग), रात्री 8.30 वाजता श्रीदेव इस्वटी ब्राह्यण महापुरुष येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ:- श्रीदेव इस्वटी ब्राह्यण महापुरुष, हरकुट बु. काळेथरवाडी, ता. कणकवली), रात्री 9.30 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 10 वा वर्धपान दिन व हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ:- श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, टेंबवाडी, शिरवल, ता, देवगड), रात्री 10 वाजता श्री जुगाई देवीच्या जीर्णोध्दार वर्धापदन दिन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ:- श्री जुगाई देवी मंदिर, धालवली, ता, देवगड), रात्री 10.30 वाजता श्री गांगेश्वर देवाची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ:- श्री गांगेश्वर मंदिर, कुणकवण, ता, देवगड),