Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणजिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य कार्यकारी...

जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी कार्यमुक्त केले…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- वरिष्ठाना चुकीची माहिती देणे,त्यांची दिशाभूल करणे, त्यांच्या आदेशाचे पालन न करणे, कामात अनियमितता असा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी कार्यमुक्त केले आहे.

प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी खेबूडकर यांनी ही कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषदेत अनेकांचे धाबे दणाणले असून ‘आता कोणाचा नंबर ‘ अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात ‘कॅफो’ सारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तडका फडकी कार्यमुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.पाटील यापूर्वी दापोली येथील कोकण कृषि विद्यापिठात कार्यरत होत्या. दि. ११, मार्च, २०२४ रोजी त्या जि. प. मध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.

कामावर रुजू होताच त्या पुन्हा काही काळ रजेवर होत्या त्यांतर त्या पुन्हा हजर झाल्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या कारकिर्दीत हजर झाल्यापासून त्या वादग्रस्त ठरल्या होत्या.त्यांच्या कामकाज पद्धतीवर अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदारही नाराज होते. अनेक महत्वाच्या बैठकांना त्या गैरहजर रहात असल्याच्या तक्रारी होत्या.

देशमुख यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नव्याने आलेले नव्याने आलेले रवींद्र खेबूडकर यांनी या सर्व प्रकरणी गंभीर दाखल घेत त्यांना वेळोवेळी समज दिली असतानाही त्यांच्या वर्तनात सुधारणा होताना दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर खेबूडकर यांनी एके दिवशी वित्त विभागाला अचानक भेट दिल्यानंतर व तपासणी केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. आणि प्रशिक्षणासाठी निघताना वरील आदेश जारी केले.

दरम्यान काल कार्यमुक्त झाल्यानंतर आज त्यांच्या दालनाबाहेर लावण्यात आलेली त्यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!