कुडाळ शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगार बुलट अन्सारी (वय २९, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर वीज पडून तो जागीच ठार…

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे काम करणाऱ्या कामगार बुलट अन्सारी (वय २९, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर वीज पडून तो जागीच ठार झाला.

कुडाळ शहरांमध्ये विजांच्या कडगटासह पाऊस कोसळला या मुसळधार असलेल्या पावसामध्ये कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे सेंट्रींगचे काम सुरू होते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार विजांचा कडकडाट झाला आणि ही वीज सेंटरिंगचे काम करणाऱ्या ठिकाणी कोसळली यामध्ये बुलट अन्सारी हा कामगार जागी ठार झाला तर त्याच्यासोबत असलेले सात ते आठ कामगारांना विजेचा धक्का बसला. त्याला उपचारासाठी ग्रामीणमध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.