कुडाळ शहराला पावसाने झोडपले!.. विजाचा कडकडाट विद्युत पुरवठा खंडित!!…

कुडाळ शहराला पावसाने झोडपले!.. विजाचा कडकडाट विद्युत पुरवठा खंडित!!..

 

कुडाळ प्रतिनिधी

गेले काही दिवस कुडाळ शहरांमध्ये वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते दरम्यान आज दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला कोसळलेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली.

गेले अनेक दिवस कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणावर उष्मा वाढला होता या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते आज मंगळवारी दुपारी विजांचा कडकडाट झाला आणि या विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पाऊस कोसळला तसेच वारा सोसाट्याचा असल्यामुळे भैरववाडी या ठिकाणी झाडे पडून विद्युत तारांचे नुकसान झाले विद्युत तारा तुटल्यामुळे कुडाळ शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता या पावसाने पूरा शहराला अक्षरशः झोडपून काढले मात्र नागरिकांच्या दिलासाही मिळाला.