वेताळ – बांबर्डे येथे आज सकाळी पोलीसांच्या जीपला  अपघात…

 

सिंधुदुर्गनगरी | (प्रतिनिधी)

वेताळ – बांबर्डे येथे आज सकाळी पोलीसांच्या जीपला झालेल्या अपघातातील जखमी पोलिसांना जिल्हा रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

                  कुडाळ -मालवणचे शिंदे सेनेचे आमदार डॉ निलेश राणे यांनी आज दुपारी तातडीने रुंग्णालयाला भेट देत सर्व सहाही जखमी पोलिसांची विचारपूस केली.यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती त्यांनी घेतली व सर्व संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या.

         या भेटीच्या वेळी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शाम पाटील,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक निलेश जोगळेकर, सिस्टर-इन-चार्ज शारदा वसावे, दादा साईल,कसाल सरपंच राजन परब, हार्दिक शिगले आदी उपस्थित होते.