महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या वतीने आज  वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे उमेद महिला मेळावा…

कुडाळ | प्रतिनिधी 

महिला वर्गांसाठी शेती पूरक व बिगर शेती बाबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा तळागाळात पोचला पाहिजे शासनाच्या दरबारी प्रस्ताव पाठवताना प्रस्तावांचा धबधबा असला पाहिजे सर्वाधिक निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा येईल यासाठी प्रशासनाने तत्पर राहिले पाहिजे ग्रामीण भागातील ज्या महिला या योजनेमधून वंचित आहेत त्या शोधून त्यांना लाभ कसा देता येईल यासाठी अधिकारीवर्ग ग्रामीण भागात पोचले पाहिजेत असे प्रतिपादन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज उमेद महिला मेळाव्यात केले

   महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या वतीने आज  वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे उमेद महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिप्ती पडते पणदूर माजी सरपंच दादा साईल प्रभारी  गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर अभियान व्यवस्थापक वैभव पवार तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड निलेश तेडोलकर राकेश कांदे नेरुर-प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाणपिंगुळी-प्रभागसंघ अध्यक्ष सौ. साधना माडये 

तेडोली-प्रभागसंघ अध्यक्ष श्रेया मोर्ये  पावशी प्रभागसंघ अध्यक्ष सुनिधी सावंत वेताळबांबर्डे-प्रभागसंघ अध्यक्ष रोहिणी कुपेरकर माणगाव-प्रभागसंघ अध्यक्ष शबनम नाईक आंब्रड-प्रभागसंघ अध्यक्ष. प्राची दळवी ओरोस प्रभाग संघ अध्यक्ष साक्षी गोसावी तसेच उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना अध्यक्ष 

उषा नेरुरकर उपाध्यक्ष सोनाली सावंत

सचिव रंजना मेस्त्री रेवती राणे कुडाळ तालुक्यातून नऊही प्रभाग संघातील सीआरपी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 

    आमदार निलेश राणे म्हणाले शासनाचा महिलांच्या विविध योजनेसाठी येत असलेल्या निधीबाबत आर्थिक व्यवस्था नीट असली पाहिजे तो निधी योग्य रित्या पोचतो की नाही याबाबत लक्ष ठेवणे हे अधिकारी वर्गासह आम्हा सर्वांचे काम आहे ज्या प्रभाग संघात निधी पोचला नाही त्या ठिकाणी पोचवावा लागेल ग्रामविकास खात्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी आहे त्या निधीसाठी आपण शेतीपूरक व बिगर शेती साठी व्यवसाय उभारणी करताना जिल्ह्यातून विकासात्मक मागणीसाठी  प्रस्तावाचा धबधबा शासन दरबारी गेला पाहिजे शासनाच्या माध्यमातून सर्वच गोष्टी झाल्या पाहिजे यासाठी मी आग्रही असणार नाही या मेळाव्यातील सर्व महिला यांच्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी माझा आमदार निधी नाही तर  ज्या ज्या तुमच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माझ्या स्वतःच्या निलेश राणे निधीतून करीन  ग्रामीण भागातील महिला कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी वर्ग ग्रामीण भागात पोचला पाहिजे  अनेक महिला या लाभापासून वंचित असतील त्याला शोधून प्रवाहात आणले पाहिजे प्रभारी गटविकास अधिकारी श्री वालावलकर  यांनी या महिला उमेद मेळाव्यात शासनाच्या माध्यमातून शेतीपूरक ची अवजारे मिळाली आहेत त्या अवजारांचा महिलांनी वापर करावा आपल्या भागातील ज्यांना  यंत्राची गरज असेल त्यांना भाड्याने देणे आवश्यक आहे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक प्रगती कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल करावी यासाठी तुम्हाला कृषीसखी मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दीपलक्ष्मी पडते यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे यासाठी दहा प्रकारची शेतीपूरक उपकरणे देण्यात आली असुन  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन  कटिबध्द आहे असे सांगितले प्रास्ताविकात साधना माडये यांनी या योजनेसाठी शासनाने कोट्यावधी निधी दिला आहे कुडाळ तालुक्यात 103 ग्राम संघामार्फत सुमारे 1791 समूह उमेद अभियानाला जोडलेले आहेत असे सांगून उमेदच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला 

यावेळी अवजार बँक मधून कुडाळ तालुक्यातील दहा ग्राम संघांना 50 लाख रुपयांचे शेतीपूरक साहित्याचे वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माणगाव प्रभाग समन्वयक हेमंत मेस्त्री आंब्रड ओरोसच्या मनीषा कांबळी पिंगुळी तेंडोली सुप्रिया वालावलकर वेताळबांबर्डे पावशी ज्योस्ना जाधव घावनळे नितीन गावडे  सामुदायिक कृषी व्यवस्थापक रसिका राणे यांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील दहा ग्राम संघांना 50 लाख रुपयांचे आज साहित्य रूपात वितरण करण्यात आले यामध्ये 

सावली ग्राम संघ साळगाव, आधार ग्रामसंघ ओरोस, प्रगती ग्राम संघ आंबेरी, महिला शक्ती  ग्रामसंघ मांडकुली , प्रगती ग्रामसंघ कुसबे ,स्वराज्य ग्रामसंघ पडवे, सावित्रीबाई ग्रामसंघ आंब्रड वैष्णवी ग्राम संघ केरवडे क नारुर, हिरकणी ग्रामसंघ पिंगुळी, क्रांती ग्रामसंघ भडगाव यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे निवेदन निलेश गुरव यांनी केले