Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणचार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ...

चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ…

देवगड / प्रतिनिधी

 

चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ ; तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी विवाहितेचा पती , सासू-सासरे यांच्या विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल

      चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय तिचा एका खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याप्रकरणी विवाहितेचा पती सागर रामदास अनभवणे (वय ३२), सासू रोहिणी रामदास अनभवणे (वय ६२) व सासरे रामदास अनंत अनभवणे (वय ६१, सर्व रा. देवगड- सातपायरी) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी २०२० ते ९ नोव्हेंबर २०२४ या घडली आहे. देवगड पोलिसांनी तीनही संशयितांना तात्काळ अटक केली असून मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली. दरम्यान, या घटनेतील संशयित रामदास अनभवणे हे माजी जि. प. सदस्य आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता सौ. साक्षी हिचा संशयित सागर अनभवणे याच्याशी १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्यांच्या प्रेमविवाहाला सागरचे वडील रामदास अनभवणे व आई रोहिणी यांचा विरोध होता. परंतु, सागरने त्यांच्या समजूत काढल्यानंतर त्यांनी विवाहास मान्यता दिली होती. लग्नाच्यावेळी पती सागरला दोन तोळ्याची सोन्याची चैन देण्याचा अट्टाहास सासरच्या मंडळींनी साक्षीच्या माहेरच्या मंडळींकडे केला होता.परंतु साक्षीच्या माहेरच्या मंडळींना आर्थिकदृष्ट्या ते शक्य झाले नाही. लग्नानंतर पती सागर, सासरे रामदास, सासू रोहिणी या संशयितांनी सौ. साक्षी हिच्या आईकडे चार तोळे सोने व मोटरसायकल देण्याची मागणी केली व मागणीच्या पूर्ततेसाठी पती व सासू सासऱ्यांनी साक्षीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सौ. पूजा ही अडिज महिन्यांची गरोदर असताना तिच्या इच्छेविरुद्ध पती सागर याने तिचा एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात केला. याप्रकरणी सौ. साक्षी हिने देवगड पोलीस स्थानकात संशयित पती सागर, सासरे रामदास अनभवणे, सासू सौ. रोहिणी या संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८९, ८५, ३१६ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!