नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर रुजू…

सिंधुर्गात खूप काही शिकता आले याचे समाधान – मावळते पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल 

 

*ओरोस,26मे(प्रतिनिधी)*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप समाधानकारक काम करता आले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरीक, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्या बद्दल त्यांनी आपल्या निरोप समारंभात समाधान व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप चांगला अनुभव मिळाला खूप काही शिकता आले याबद्दल सौरभ कुमार अग्रवाल यांनी आवर्जून उल्लेख केला. 

       सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ठाणे ग्रामीण येथील कार्यरत असलेले मोहन दहीकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. नव्या पोलीस अधीक्षकांचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. मावळते पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्याचे नूतन पोलीस मोहन दहिकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या. 

          जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सोमवारी नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत व मावळत्या पोलीस अधीक्षकांना निरोपाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक भवनात झाला. अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यामुळे अनेक चांगले उपक्रम राबविता आले. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य दिले व या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी कारवाया यावर वचक ठेवता आला याबद्दल सौरभ कुमार अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले.