Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*आमदार निलेश राणेंकडून माणगाव खोऱ्यातील साळगाव, आंबेरी, दुकानवाड येथील रस्ते व पुलांची...

*आमदार निलेश राणेंकडून माणगाव खोऱ्यातील साळगाव, आंबेरी, दुकानवाड येथील रस्ते व पुलांची पाहणी*

कुडाळ | प्रतिनिधी 

 

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी तसेच दुकानवाड येथे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम सुरू असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि व्यवस्थित व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. त्याच प्रमाणे साळगाव माणगाव पंतप्रधान सडक रस्त्याच्या कामाचीही पाहणी करून वाहतूक सुरळीत सुरू व्हावी यासाठीच्या सूचना दिल्या. 

यावेळी जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. धीरज पिसाळ, श्री. मोहिते, मोहन सावंत, पंढरीनाथ परब तसेच माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!