महामार्गावर लागली आग; प्रशासनाची धावपळ..! प्रशासनाकडून आपत्कालीन रंगीत तालीम…!!

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील सांगिर्डेवाडी येथे वाहनांना आग लागली आहे अशी माहिती तहसीलदार कार्यालयाच्या नियंत्रण कक्षा मधून प्रत्येक विभागाला गेली आणि लागलीच प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने आपला मोर्चा महामार्गावर वळवला. नागरिकांमध्ये घबराहट झाली मात्र त्यानंतर ही रंगीत तालीम होती हे निष्पन्न झाले.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे किंवा सतर्क राहू शकते यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी रंगीत तालीम घेतली. तहसीलदार कार्यालयातून प्रशासनाच्या सर्व विभागांना संपर्क साधण्यात आला महामार्गावरील सांगिर्डेवाडी येथे वाहनांना आग लागली आहे काही नागरिक अडकले आहेत तात्काळ आपली यंत्रणा त्या ठिकाणी पाठवा असा संदेश गेल्यावर प्रशासनातील प्रत्येक विभागाने आपला मोर्चा महामार्गावर वळवला मात्र त्या ठिकाणी आल्यावर समजले की ही रंगीत तालीम होती यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, महसूल नायक तहसीलदार संजय गवस, नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, मंडळ अधिकारी गुरव, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी पोलीस विभाग, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, कुडाळ नगरपंचायत या विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते