कुडाळ | प्रतिनिधी
तुपटवाडी येथील सेवानिवृत्त एस. टी. बस चालक अनंत धोंडदेव भोगटे (वय ८३) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज (शुक्रवारी) रात्री ८.३० वा. त्यांच्या राहत्या घराकडून निघणार आहे. कुडाळ नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचे वडील होत.
कुडाळ शहरातील अनंत उर्फ अण्णा भोगटे हे गेले अनेक दिवस आजारी होते त्यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले ते एस. टी. बस महामंडळामध्ये चालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.
