*गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड*

कोल्‍हापूर 30मे

|सु|सा|ट|टी|म|

गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्‍या निवडीकरीता सुचक म्‍हणून – विश्वास नारायण पाटील व अनुमोदक म्‍हणून – अरुण गणपतराव डोंगळे आहेत.

 यावेळी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध पुणे), संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

▪️गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांच्या निवडीचा लखोटा राजश्री शाहू आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आबाजी यांना दिला