केंद्र शासनाच्या अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल महाराष्ट्र राज्यामध्ये देवगड तालुक्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे .या यशामुळे देवगड पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमृत महाआवास अभियान २०२२-२३ पुरस्काराचे वितरण ३ जून रोजी बालेवाडी येथे केंद्रीय मंत्री ग्रामविकास विभाग गिरिराज सिंह व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे .सदरील कार्यक्रम सोहळयासाठी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव तसेच तत्कालिन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत .
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने अमृत महाआवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील राज्यांचा आढावा घेण्यात आला . महाराष्ट्रातील विविध तालुक्यांनी या अभियानात उल्लेखनीय प्रगती केली असून यामध्ये देवगड तालुक्याने आपले काम उत्कृष्टरित्या पार पाडीत राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे . या यशाबददल सर्वस्तरावरुन पंचायत समिती देवगडचे अभिनंदन करण्यात येत आहे .
