Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकलमठमध्ये ४ ठिकाणी चोरट्यांनी बंगले फोडले भर वस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ ; पोलिसांचे...

कलमठमध्ये ४ ठिकाणी चोरट्यांनी बंगले फोडले भर वस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ ; पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून

कलमठ-बिडयेवाडी येथील ४ बंद असलेले बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडत धाडसी चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला, चोरट्यांनी बंगल्यांमधील मौल्यवान वस्तू लंपास केल्या असल्याचा अंदाज आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. भरवस्तीत त चोरट्याने बंगले फोडून धुमाकूळ उडवला आहे.मात्र या घरांमधील मालक नसल्यामुळे अधिकृत चोरी कितीची झाली याबाबत कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात दाखल नव्हती.

कलमठ बिडयेवाडी येथील परिसरात बंद असलेले बंगले संधी साधून चोरट्यांनी फोडले. बंगल्यांमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी आतील चोरी केल्याचा अंदाज आहे. काही बंगल्यांमध्ये चोरट्यांनी आतील सामान विस्कटले आहे. बंगल्यांचे मालक बाहेर असल्याने चोरीत किती मुद्देमाल गेला हे समजू शकले नाही. चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कैद झाले आहेत. या चोरीवरून कणकवलीत पुन्हा एका चोरटे सक्रिय झाले आहेत. चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरी झालेल्या घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व कणकवली पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून या बिडयेवाडी परिसरात होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!