Thursday, December 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळएस. टी. बस व मोटरसायकल अपघातात महिला झाली जखमी

एस. टी. बस व मोटरसायकल अपघातात महिला झाली जखमी

अपघातात सुदैवाने भाऊ-बहीण वाचली….! ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला अपघात…!!

 

कुडाळ प्रतिनिधी 

कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली. त्यामध्ये एक मोटरसायकल एस. टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्यावर कुडाळ ग्रामीण येथे उपचार करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन या अपघाताचा पंचनामा केला.

 

कुडाळ वरून बांव गावासाठी निघणारी संध्याकाळची बस बांबुळी शेंडा येथे आल्यावर बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार बचावला. पण ही बस चालकाने डाव्या बाजूला घेऊन गेल्यावर त्या बाजूने बांवच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलवर धडक बसली. ही मोटरसायकल बसच्या मागील चाकाखाली गेली. या मोटरसायकलवर महेंद्र मनोहर मेस्त्री व त्यांची बहीण धनश्री धनाजी सावंत या होत्या. बहिण भाऊ चेंदवण वरून बांव येथे आपल्या पाहुण्याजवळ जात होत्या. त्या अपघातात धनश्री सावंत हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिला कुडाळ ग्रामीण मध्ये उपचारासाठी दाखल केले. आज (बुधवार) आठवडा बाजार असल्यामुळे या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. अपघात झाल्यावर चालकाच्या बाजूने असलेल्या दरवाजाने सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन या अपघाताचा पंचनामा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!